मेरी कोम, सिंधूला संधी, ऑलिंपिक संघटनेच्या ॲथलीट आयोगात स्थान

मेरी कोम सिंधू यांच्यासह भारताच्या दहा खेळाडूंची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ॲथलीट आयोगात लागली वर्णी
Mary Kom PV Sindhu among 10 Olympians elected in IOA Athletes Commission
Mary Kom PV Sindhu among 10 Olympians elected in IOA Athletes Commissionsakal

Athletes Commission of the IOA formed : पाच वेळा विश्‍वविजेती ठरलेली मेरी कोम, दोन वेळा ऑलिंपिक पदकविजेती ठरलेली सिंधू यांच्यासह भारताच्या दहा खेळाडूंची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ॲथलीट आयोगात वर्णी लागली आहे. दहा जागांसाठी दहा खेळाडूच या निवडणुकीला उभे राहिले होते. त्यामुळे या सर्वांचीच बिनविरोध निवड झाली आहे.

निवडून आलेल्या दहा खेळाडूंमध्ये पाच महिला खेळाडूंचा समावेश आहे. तसेच दहाही खेळाडू ऑलिंपियन आहेत. मेरी कोम, सिंधू यांच्यासह टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू, हॉकीपटू रानी रामपाल, तलवारबाज भवानी देवी या महिला खेळाडूंचा समावेश आहे. पुरुष खेळाडूंमध्ये हिवाळी ऑलिंपियन शिवा केशवन, ऑलिंपिक ब्राँझपदक विजेता नेमबाज गगन नारंग, अनुभवी टेबलटेनिस खेळाडू अचंता कमल, रोईंग खेळाडू बजरंग लाल आणि माजी गोळाफेक खेळाडू ओ. पी. करहाना यांचा समावेश आहे.

ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारे अभिनव बिंद्रा व भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार सरदार सिंग यांचाही या आयोगात समावेश करण्यात आला आहे. बिंद्रा हे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीत आणि सरदार आशियाई ऑलिंपिक परिषदेत सदस्य असणार आहेत.

१० डिसेंबरला निवडणूक

निवडण्यात आलेल्या आयोगातील दोन सदस्य भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या कार्यकारी परिषदेत असणार आहेत. एक महिला व एक पुरुष असे दोन सदस्य यामध्ये असतील. यासाठी येत्या १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून या निवडणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com