

नवी दिल्ली : अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) रविवारी रंगलेल्या फॉर्म्युला वन (Formula 1) शर्यतीत नवे नाट्य पाहायला मिळाले. लुईस हॅमिल्टन (Luis Hamilton) विक्रमी जेतेपदावर मोहोर उमटवण्यापासून थोडक्यात दूर राहिला. मॅक्स वेर्स्टापेन (Max Verstappen) याने अखेरच्या क्षणी ही शर्यत जिंकून पहिल्यांदाच फॉर्म्युला वन जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. पण ही शर्यत संपत असताना घडलेल्या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेला गालबोट लागले. (Max Verstappen controversial victory over Luis Hamilton in Formula 1 Abu Dhabi)
भारताचा फॉर्म्युला वन ड्रायव्हर नारायण कार्तिकेयन (Narayan Kartikey) याने या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटले की, फॉर्म्युला वनमध्ये सर्वांनाच चुरस पाहायला आवडते. पण अबुधाबीत (Abu Dhabi) जे काही घडत होते ते मॅक्सने ही शर्यत जिंकावी यासाठीच करण्यात येत होते असे वाटले. शर्यतीत सर्व काही योग्य असावे, पण या शर्यतीत खेळाला न्याय मिळाला नाही. ही शर्यत खरेतर हॅमिल्टनचीच होती, असे ठामपणे तो पुढे म्हणाला.
कार्तिकेयन पुढे म्हणाला, अपघातानंतर सेफ्टी कार ट्रॅकवर येण्याआधी लुईस हॅमिल्टन व मॅक्स वेर्स्टापेन यांच्यामध्ये जवळपास ११ सेंकदांपेक्षा जास्त अंतर होते. अपघातानंतर मर्सिडीजने (Mercedes) लुईस हॅमिल्टनला थांबायला सांगितले. हे योग्य पाऊल होते. कारण लुईस हॅमिल्टनच्या कारने ५० लॅप पूर्ण केले होते. या कारचे टायर कठीण झाले होते. मॅक्स वेर्स्टापेनच्या (Max Verstappen) रेड बुलने अगदी त्याउलट केले. याच कारणामुळे लुईस हॅमिल्टन (Luis Hamilton) हा आठव्या अन् विक्रमी जेतेपदासाठीचा हकदार होता, असे कार्तिकेयन यावेळी आवर्जून म्हणाला. दरम्यान, लुईस हॅमिल्टनचा रेस इंजीनियर पीटर बोनिंग्टन हा कधीकाळी नारायण कार्तिकेयनचाही रेस इंजीनियर होता.
निकोलस लतीफीचा ५३ व्या लॅपवर अपघात झाला. याचवेळी लुईस हॅमिल्टन शर्यत जिंकण्याच्या दिशेने रूढ झाला होता. पण अपघातामुळे सेफ्टी कार ट्रॅकवर आली. लुईस हॅमिल्टन ५० लॅपपर्यंत चालवलेल्या कठीण टायरसह तिथेच थांबला. रेड बुलने मात्र मॅक्स वेर्स्टापेनला (Max Verstappen) सॉफ्ट टायरसाठी पुढे पाठवले. पाच बॅकमार्कर्स यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. याचा फायदा मॅक्स वेर्स्टापेनला झाला.
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही शर्यत संपल्यानंतर सोशल साईटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी तो म्हणाला, शर्यत शानदार होती! मॅक्सला पहिल्या जेतेपदासाठी शुभेच्छा! मात्र मोसम गाजवणाऱ्या हॅमिल्टनसाठी वाईट वाटत आहे. सेफ्टी कार ट्रॅकवर आली नसती तर हॅमिल्टनकडे ट्रॉफी राहिली असती. नशिबाची साथ लाभली नाही. पुढच्या मोसमासाठी शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.