Australia Vs WestIndies
Australia Vs WestIndiessakal

Australia Vs WestIndies: ऑस्ट्रेलियाचा टी-२० मालिकेत विजयाचा दमदार चौकार; वेस्ट इंडीजवर तीन विकेट राखून मात

Australia vs West Indies 4th T20 match: ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० मालिकेतील चौथा सामना तीन विकेट्सने जिंकला. मॅक्सवेल, इंग्लिस आणि ग्रीन यांच्या चमकदार कामगिरीमुळे हा विजय मिळाला.
Published on

सेंट किट्‌स : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वेस्ट इंडीज दौऱ्यातील धडाकेबाज कामगिरी रविवारीही कायम राहिली. ग्लेन मॅक्सवेलची अष्टपैलू चमक (दोन झेल व १८ चेंडूंमध्ये ४७ धावा) आणि जॉश इंग्लिस (५१ धावा), कॅमेरुन ग्रीन (नाबाद ५५ धावा) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडीज संघावर तीन विकेट व चार चेंडू राखून मात केली आणि पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा हा टी-२० मालिकेतील सलग चौथा विजय ठरला. मॅक्सवेलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com