Team India : भारतीय निवड समितीने घेतला मोठा निर्णय! वयाच्या ३२व्या वर्षीच 'या' खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त

बराच काळपासुन टीम इंडियातून बाहेर आता करारातूनही ....
Team-India
Team-Indiasakal

Bcci Annual Contract List Team India : बीसीसीआयने 2022-23 हंगामासाठी टीम इंडियाचा वार्षिक करार जाहीर केला आहे. 32 वर्षीय धडाकेबाज फलंदाज या यादीत दिसत नाही. खराब कामगिरीमुळे या खेळाडूला वार्षिक कराराच्या यादीतून वगळण्यात आले आहे. गेल्या अनेकवेळा या खेळाडूला टीम इंडियाच्या संघात स्थान मिळले नाही. आता या खेळाडूसाठी संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे.

Team-India
Virat Kohli: ''दारू पिल्यानंतर मी कुणालाच ऐकत नव्हतो...''पत्नी अनुष्कासमोर विराटचा मोठा खुलासा

फलंदाज मयंक अग्रवाल बीसीसीआयच्या वार्षिक करारात स्थान मिळवू शकलेला नाही. मयंक अग्रवाल बराच काळपासुन टीम इंडियातून बाहेर आहे. आता त्याला वार्षिक करारातूनही वगळण्यात आले आहे. मयंकने गेल्या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध अत्यंत खराब कामगिरी केली होती, त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता.

Team-India
लहान मुलाला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी; स्टेडियमवरील थरारक Video Viral

भारतीय कसोटी संघाने गेल्या वर्षी जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. हा सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह झाला होता, त्यामुळे मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र या सामन्यात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मयंक अग्रवालला बॅकअप सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये गेला होता, त्यानंतरही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

Team-India
लहान मुलाला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी; स्टेडियमवरील थरारक Video Viral

मयंकने भारतासाठी आतापर्यंत एकूण 21 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 5 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 17.2 च्या सरासरीने केवळ 86 धावा केल्या आहेत.

मयंक अग्रवाल आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादने मयंक अग्रवालवर सर्वात मोठी बोली लावली आणि 8.25 कोटी खर्च करून त्याचा संघात समावेश केला. गेल्या मोसमात तो पंजाब किंग्जचा भाग होता, पण खराब खेळामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com