मंबई क्रिकेट संघटनेचा निवडणूक सहभाग अनिश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुंबई क्रिकेट संघटनेने अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्या दृष्टीने त्यांनी सर्व कागदपत्रे भारतीय मंडळास पाठवलीही आहेत; पण अद्यापही त्यांच्या निवडणूक सहभागाबाबत अनिश्‍चितताच आहे.

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्या दृष्टीने त्यांनी सर्व कागदपत्रे भारतीय मंडळास पाठवलीही आहेत; पण अद्यापही त्यांच्या निवडणूक सहभागाबाबत अनिश्‍चितताच आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाने संलग्न संघटनांना मंडळाच्या घटनेनुसार घटना तयार करण्यास; तसेच निवडणूक अधिकारी नेमण्यास सांगितले आहे. ही प्रक्रिया 26 संघटनांनी पूर्ण केली आहे; तर अन्य चार संघटनांची लवकरच पूर्ण होईल. ज्या संघटना निकष पूर्ण करतील, त्यांनाच भारतीय मंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असेल, असे भारतीय क्रिकेट मंडळावरील प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले.

आम्ही या संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली कागदपत्रे भारतीय मंडळाकडे पाठवली आहेत. त्यांच्या निर्णयाची आम्हालाही प्रतीक्षा आहे. त्यांचा ई-मेल आला असेल; पण गेले काही दिवस मुंबईत पाऊस सुरू आहे. त्यामुळे आम्ही कार्यालयात जाऊन ई-मेल चेक केलेला नाही. आज सोमवारी संघटनेच्या कार्यालयास साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे आज काही सांगता येणार नाही, असे मुंबई क्रिकेट संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mca still awaiting its bcci election participation