BBL : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! पावसामुळे नाही तर 'या' कारणामुळे सामना झाला रद्द

BBL clash abandoned due to dangerous pitch Melbourne Renegades vs Perth Scorchers
BBL clash abandoned due to dangerous pitch Melbourne Renegades vs Perth Scorcherssakal

BBL clash abandoned due to dangerous pitch : भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका आज पासून सुरू होणार आहे. या बरोबरच ऑस्ट्रेलियात टी -20 बिग बॅश लीग खेळल्या जात आहे. बिग बॅश लीगचा हा 13वा हंगाम 7 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. पण बिग बॅश लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे नाही तर खराब खेळपट्टीमुळे मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला.

BBL clash abandoned due to dangerous pitch Melbourne Renegades vs Perth Scorchers
SA vs IND 1st T20 : मालिकेचा पहिला टी-20 सामना होणार रद्द? दक्षिण आफ्रिकेतून मोठी बातमी आली समोर

या हंगामातला हा चौथा सामना होता. मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार निक मॅडिन्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीची अवस्था इतकी वाईट होती की फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले होते. पर्थ स्कॉचर्सचे सलामीवीर स्टीफन (0) आणि कूपर (6) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. अॅरॉन हार्डी आणि जोश इंग्लिस हे कसेतरी गोलंदाजांचा सामना करत होते पण 6.5 षटकांनंतर खराब खेळपट्टीमुळे सामना थांबवावा लागला.

पंचांनी दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी दीर्घ संभाषण केले. आणि यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघांना समान गुण देण्यात आले आहे.

BBL clash abandoned due to dangerous pitch Melbourne Renegades vs Perth Scorchers
India vs Pakistan : बीडच्या 'सचिन'समोर पाकिस्तान आला रडकुंडी! ठोकले खणखणीत अर्धशतक

हा सामना जिलॉन्गच्या सिमंड्स स्टेडियमवर खेळला जात होता. काल रात्री येथे खुप पाऊस झाला. खेळपट्टीवर काही डाग पण दिसत आहे, ज्यावरून असे दिसते की कव्हरमधून पाणी खेळपट्टीवर गेले आहे. त्यामुळेच खेळपट्टीवर अनियमित बाऊन्स मिळू लागला. या खेळपट्टीवर फलंदाज दुखापती होऊ शकतात. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

6.5 षटकांच्या खेळातील खेळपट्टीचे रूप पाहून क्रिकेटपटूही आश्चर्यचकित झाले. विकेटकीपिंग करणारा क्विंटन डी कॉकही काही चेंडूंवर अवाक होताना दिसला. या घटनेनंतर बिग बॅश लीगचे आयोजक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला नक्कीच लाज वाटली असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com