सिनसिनाटी : इंटर मियामी एफसीला सिनसिनाटीकडून ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मेजर लीग सॉकर स्पर्धेत सलग पाच सामन्यांत एकापेक्षा अधिक गोल करण्याची लिओनेल मेस्सीची विक्रमी मालिका संपुष्टात आली..सिनसिनाटीविरुद्ध या सामन्यात मेस्सीला एकही गोल करता आला नाही. पहिल्या सत्रात गेरार्डो व्हॅलेन्झुएलाच्या गोलमुळे सिनसिनाटीने आघाडी घेतली, तर दुसऱ्या सत्रात एव्हांडरच्या दोन गोलांमुळे त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे सिनसिनाटीने ईस्टर्न कॉन्फरन्समध्ये फिलाडेल्फिया युनियनच्या केवळ एका गुणाने मागे राहत आपले दुसरे स्थान कायम राखले. दुसरीकडे, फिलाडेल्फियाने सीएफ मॉन्ट्रियलला २-१ने पराभूत केले..या पराभवामुळे इंटर मियामीची सलग पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली असून, सध्या संघ पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील या मेजर लीग सॉकर स्पर्धेत सलग पाचपेक्षा अधिक सामन्यांत एकापेक्षा अधिक गोल करण्याचा विक्रम मेस्सीने केला आहे. त्याने १७ सामन्यांतून १६ गोल केले असून, तो लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रस्थानी आहे; मात्र सिनसिनाटीविरुद्ध या सामन्यात तो प्रभाव टाकू शकला नाही..मेस्सीने आतापर्यंत सिनसिनाटीविरुद्ध फक्त तीन वेळा खेळले आहे. तरीही आठ वेळा ‘सर्वोत्तम फुटबॉलपटू’चा (Ballon d’Or) सन्मान मिळवलेल्या या दिग्गजांसमोर सिनसिनाटीच्या खेळाडूंनी अडथळे निर्माण करीत त्याला रोखून धरले..Japan Open 2025: लक्ष्यसह सात्विक-चिराग यांचेही आव्हान संपुष्टात.या सामन्यात गोल करण्याचा मेस्सीचा पहिला प्रयत्न पहिल्या अर्धाच्या भरपाई वेळेत झाला होता; परंतु त्याचा फटका गोलरक्षक रोमन सेलेन्टानोने सहजपणे रोखला. त्यानंतर ७८व्या मिनिटालाही मेस्सीला संधी मिळाली; मात्र त्याचा जवळचा फटका सेलेन्टानोने झडप घालून अडवला. शनिवारी सिनसिनाटीचा सामना रियल सॉल्ट लेकविरुद्ध तर इंटर मियामी न्यूयॉर्क रेड बुल्सविरुद्ध खेळणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.