
मियामी : लिओनेल मेस्सीने स्वतः गोल केला नसला, तरी त्याने दोन्ही गोलांसाठी दिलेले सहाय्य इंटर मियामीच्या विजयात मोलाचे ठरले. लीग्स करंडक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात इंटर मियामीने ॲटलसर संघावर २-१ असा विजय मिळवला. यातील दुसरा गोल भरपाई वेळेत अखेरच्या क्षणी झाला.