WPL 2023 : दुनिया हिला देंगे हम! हरमनच्या मुंबई इंडियन्सची थाटात फायनल मध्ये एन्ट्री : Mumbai Indians Final WPL 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WPL 2023 : दुनिया हिला देंगे हम! हरमनच्या मुंबई इंडियन्सची थाटात फायनलमध्ये एन्ट्री

WPL 2023 : दुनिया हिला देंगे हम! हरमनच्या मुंबई इंडियन्सची थाटात फायनलमध्ये एन्ट्री

Mumbai Indians defeat UP Warriorz to enter final WPL 2023 : सलग पाच विजयांसह महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात दमदार सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबईने WPL च्या पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. एलिमिनेटर सामन्यात मुंबईने यूपी वॉरियर्सचा 72 धावांनी एकतर्फी पराभव केला. मुंबईच्या विजयात नॅट सिव्हर-ब्रंटची अष्टपैलू कामगिरी आणि इझी वोंगची हॅटट्रिक यांचा मोठा वाटा होता.

विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 26 मार्चला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाईल आहे. गुणतालिकेत अव्वल दोन संघच अंतिम फेरीत आमनेसामने येतील. मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीने तिसरे स्थान मिळवून एलिमिनेटरमध्ये प्रवेश केला होता.

यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने 20 षटकांत 4 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ 17.4 षटकांत 110 धावांवर गारद झाला. नताली स्कायव्हर ब्रंटच्या नाबाद 72 आणि इस्सी वोंगच्या हॅट्ट्रिकमुळे मुंबईने शानदार विजय मिळवला. इस्‍सी वाँगने चार षटकांत 15 धावा देत चार बळी घेतले. महिला प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली. तिने किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर 183 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते. मुंबईने 20 षटकांत 4 बाद 182 धावा केल्या. नताली सीव्हर ब्रंटने शानदार खेळी करत 38 चेंडूत नाबाद 72 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि दोन षटकार निघाले. अमेलिया केरने 19 चेंडूत 29, हीली मॅथ्यूजने 26 चेंडूत 26 आणि यास्तिका भाटियाने 18 चेंडूत 21 धावा केल्या.

'करो या मरो'च्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट शांत राहिली. तिने 15 चेंडूत 14 धावा केल्या. शेवटच्या षटकात पूजा वस्त्राकरने चार चेंडूत 11 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने दोन तर अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांना प्रत्येकी एक विकेट घेतल्या.