VIDEO : मायकल क्लार्कच्या गर्लफ्रेंडने कानाखाली काढला जाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Michael Clarke Viral Video

VIDEO : मायकल क्लार्कच्या गर्लफ्रेंडने कानाखाली काढला जाळ

Michael Clarke Viral Video : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आता सध्या चर्चेत आला आहे. खंर तर कर्णधारपदाखाली विश्वचषक जिंकून देणारा मायकेल क्लार्क त्याच्या मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आला. क्लार्कला कानाखाली मारण्याबरोबरच प्रेयसीने त्याच्यावर प्रेमात फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.

हेही वाचा: IND vs NZ: गिलने वरचढ ठरणाऱ्या किवी गोलंदाजांविरुद्ध वापरली खास ट्रिक मॅच संपल्यावर म्हणाला...

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मायकेल क्लार्कला त्याची गर्लफ्रेंड कानाखाली मारताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर या कानाखालीचा वर्षाव होत आहे. नंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या गर्लफ्रेंडच्या बहिणीच्या नवऱ्याला धक्काबुक्की केल्याचेही पाहायला मिळाले.

हेही वाचा: IND vs NZ: 'आप बस मुझे दुआ दो...' आईचे आशीर्वाद घेण्यासाठी सिराज सामन्यापूर्वी न सांगता घरी

मायकल क्लार्कचा गर्लफ्रेंडसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये क्लार्क आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगतांना ऐकू येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार सुट्टी एन्जॉय करत होता. त्यादरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडशिवाय त्याची बहीण जास्मिन आणि तिचा पती कार्ल स्टेफानोविक देखील तिथे होते. डेली टेलिग्राफने क्लार्क आणि त्याच्या गर्लफ्रेंडमधील भांडणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.