
CSA T20 League: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी येथे खेळून पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिका लवकरच टी-20 लीग सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे संघ इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. या मिनी आयपीएलला यशस्वी करण्याची महत्वाची जबाबदारी ग्रॅमी स्मिथकडे देण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक अंबानी, एन श्रीनिवासन यांची चेन्नई सुपरकिंग्स, पार्थ जिंदल यांची दिल्ली कॅपिटल्स, मारन यांची सनरायझर्स हैदराबाद, संजीव गोएंका यांची लखनऊ सुपर जायंट्स आणि मनोज बदाले यांच्या राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझींनी आफ्रिकेच्या मिनी आयपीएलमधील संघ खरेदी करण्यास पसंती दिली आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने सर्वांधिक मोठी आर्थिक बोली लावली आहे, ज्याची रक्कम जवळपास 250 कोटींच्या घरात गेली आहे. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक फ्रँचायझीला 10 वर्षांसाठी फ्रँचायझी फीच्या 10 टक्के रक्कम भरावी लागेल. मुंबई इंडियन्सने केपटाउनमध्ये आपला संघ बनवण्यास पसंती दिली आहे. चेन्नईच्या फ्रँचायझीला जोहान्सबर्ग येथील फ्रँचायझी मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.