esakal | अखेर आर्थरच्या जागी हाच माजी खेळाडू झाला पाकिस्तानचा प्रशिक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

Misbah Ul Haq appointed as Pakistan Cricket Team Coach

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज माजी कर्णधार मिस्बा उल हक याची पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वकार युनूस याची नियुक्ती करण्यात आली. 

अखेर आर्थरच्या जागी हाच माजी खेळाडू झाला पाकिस्तानचा प्रशिक्षक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज माजी कर्णधार मिस्बा उल हक याची पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून वकार युनूस याची नियुक्ती करण्यात आली. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रमुख प्रशिक्षक मिकी आर्थर, फलंदाजीचे प्रशिक्षक अझहर मेहमूद, गोलंदाजीचे प्रशिक्षक ग्रॅंट फ्लोव्हर आणि ट्रेनर ग्रॅंट लूडेन यांचा पाकिस्तान संघासोबतचा करार वाढविण्यास नकार दिला होता त्यामुळे या सर्व जागा रिक्त झाल्या होत्या. 

मिकी आर्थर यांच्यानंतर रिक्त झालेल्या या प्रशिक्षकपदाच्या जागेसाठी मिस्बाला पाकिस्तानातून वाढता पाठिंबा मिळत होता. मिस्बाला निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही नेमण्यात आले आहे. 

loading image
go to top