Johnson-Warner Controversy : 'वॉर्नरने घाणेरडे मेसेज...', ऑस्ट्रेलियन फलंदाजासोबत कधी बिनसलं, जॉन्सनचा मोठा खुलासा

Mitchell Johnson on David Warner marathi news
Mitchell Johnson on David Warner marathi newssakal
Updated on

Johnson and Warner Controversy : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडू मिचेल जॉन्सन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात काही दिवसांपूर्वी वादाची ठिणगी पडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये भूकंप झाला.

मिचेल जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर अजूनही खेळत आहे. मात्र, तोही आता कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे. वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळणार आहे.

मिशेल जॉन्सनने याच गोष्टीवरून वादाला सुरुवात केली होती, पण आता त्याने काही जुन्या गोष्टींचा खुलासा करत त्याच्या आणि डेव्हिड वॉर्नरमध्ये वाद कसा सुरू झाला हे सांगितले आहे.

Mitchell Johnson on David Warner marathi news
Team India Test : रोहित शर्मानंतर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कसोटी कर्णधार? दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा

जॉन्सन आणि वॉर्नर यांच्यातील भांडण कधी झाली सुरू?

दोन दिवसांपूर्वी मिशेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर एका द वेस्ट ऑस्ट्रेलियन वृत्तसंस्थासाठी आपल्या कॉलम लिहित जोरदार हल्ला चढवला होता. आणि सँडपेपर प्रकरणात दोषी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरला हिरो सारखा निरोप का मिळत आहे, असा सवाल केला होता.

याशिवाय जॉन्सनने ऑस्ट्रेलियन क्रिकेटला विचारले होते की, खराब फॉर्म असूनही वॉर्नरला कसोटी संघात का स्थान देण्यात आले? जॉन्सनच्या या विधानामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी मिचेल जॉन्सनवर टीका केली होती, त्यानंतर जॉन्सनने काही नवीन खुलासे केले आहेत.

जॉन्सन म्हणाला की, हा लेख लिहिणे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण मला माहित होते की ते लोकांचे लक्ष वेधून घेईल, परंतु हे माझे मत होते. लोकांना हा लेख आवडला आहे आणि त्यांना असे वाटते की त्याची एक वैयक्तिक बाजू असावी, जी खरोखर आहे.

पुढे जॉन्सन म्हणाला की, काही वेळापूर्वी डेव्हिड वॉर्नरने मला एक मेसेज पाठवला होता, जो खूप घाणेरडे होता. त्याचा तो मेसेज इतका वाईट होता की मी सांगूही शकत नाही, पण मी वॉर्नरला फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. या मेसेजपूर्वी आमचे संबंध तितके खराब नव्हते जितके त्या मेसेजनंतर झाले आहेत. त्या मेसेजमुळे मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्या मेसेजमध्ये वॉर्नरने मला जे काही सांगितले ते मी कोणाला सांगणार नाही, पण आता वॉर्नरवर अवलंबून आहे की तो या विषयावर माझ्याशी बोलतो की नाही. तो माझ्याशी बोलला तर मी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com