अश्विन, मिताली राजसह या खेळाडूंचं मुंबईत आगमन

अश्विन, मिताली राजसह या खेळाडूंचं मुंबईत आगमन

India tour of Enland : इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातील रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर, मयंक अग्रवाल, मोहम्मद सिराज आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज बुधवारी मुंबईमध्ये दाखल झाले. बीसीसीआयने (BCCI) याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर खेळाडूंचा फोटो पोस्ट करत म्हटलेय की, ‘पहिला टप्पा मुंबई, टीम इंडिया’ (mithali raj ravichandran ashwin to siraj team india uk bound players arrive in mumbai by charter flight)

नुकताच कोरोनामुक्त झालेला ऋद्धिमान साहा आणि स्टँडबाय खेळाडू 24 मे रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसह मुंबईत राहणारे सर्व खेळाडू भारतीय संघासोबत 24 मे रोजी जोडले जाणार आहेत. भारतीय पुरुष आणि महिला संघ एकत्र इंग्लंडला रवाना होणार आहे.

अश्विन, मिताली राजसह या खेळाडूंचं मुंबईत आगमन
WTC फायनल ड्रॉ झाली तर काय? टीम इंडियालाही पडलाय प्रश्न

भारतीय पुरुष संघाला 18 जून ते 22 जून दरम्यान साउथम्पटन येथे WTC फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत दोन हात करायचेय. त्यानंतर इंग्लंडविरोधात कसोटी मालिका होणार आहे. महिला संघ इंग्लंड संघाविरोधात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय, तीन टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. भारतातून संघ लंडनला रवाना होणार आहे. याठिकाणाहून लगेच संघ साउथहॅम्पटनला पोहचले. याच ठिकाणी भारतीय संघ क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करेल. मुंबईत भारतीय संघ एकत्रित येणार असून 24 मे रोजी मुंबईतील स्थानिक खेळाडू बायोबबल वातावरणात दाखल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com