esakal | MIvsDC : फायनल मॅचपूर्वी सचिनने मुंबई इंडियन्सला केलं चार्ज; वाचा काय म्हणाला
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin_tendulkar

यंदा आयपीएलच्या मोसमात दोन्ही संघांदरम्यान ३ सामने खेळले गेले असून तिन्ही सामन्यात मुंबईने दिल्लीला धूळ चारली आहे.

MIvsDC : फायनल मॅचपूर्वी सचिनने मुंबई इंडियन्सला केलं चार्ज; वाचा काय म्हणाला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

IPL 2020 : मुंबई : मिनी वर्ल्डकप अशी तुलना केल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा आज अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईचे यंदा पहिल्यांदाच आयपीएलची फायनल गाठलेल्या दिल्ली पुढे तगडे आव्हान असणार आहे. 

यंदा आयपीएलच्या मोसमात दोन्ही संघांदरम्यान ३ सामने खेळले गेले असून तिन्ही सामन्यात मुंबईने दिल्लीला धूळ चारली आहे. त्यामुळे चार जेतेपदं पटकावलेल्या मुंबईचं पारडं जड वाटत आहे. या फायनल मॅचसाठी मुंबईला आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर पेजवरून याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  

मुंबईच्या टीमला शुभेच्छा देताना सचिन म्हणाला, ''मुंबई इंडियन्स म्हणून तुम्ही जेव्हा मॅच खेळायला मैदानात उतरता तेव्हा तुम्ही एकटे नसता, तर तुमच्यासोबत मोठा ऊर्जेचा समूह असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा संघ हा एक कुटुंब आहे. आयुष्याप्रमाणे आयपीएलसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत अनेक आव्हाने आणि अडथळे येतात. टीमच्या वाट्याला अनेक चढ-उतार येतात. ज्यामध्ये आपण एकमेकांसोबत असतो. संघ मालकांपासून, सपोर्ट स्टाफपर्यंत सगळेजण तुम्हाला सपोर्ट करत असतात. टीम स्पीरिटने तुम्ही पूर्ण क्षमतेने खेळा," असे म्हणत सचिनने मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे. 

(Edited by : Ashish N. Kadam) 

loading image