IPL खेळण्यासाठी पाकचा 'हा' खेळाडू सोडणार देश?

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

पाकिस्तानचा वेगवान गोलंदज महंमद आमीरने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घोषित केली आहे. आता तो ब्रिटनचे नागरिकत्व मिळविण्यासाछी अर्ज केला आहे. त्याची पत्नी ब्रिटनची असल्याने त्याने हा अर्ज केला असल्याची माहिती होती मात्र, आता आयपीएल खेळता यावी म्हणून त्याने हा अर्ज केल्याची चर्चा केली जात आहे. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचा वेगवान गोलंदज महंमद आमीरने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घोषित केली आहे. आता तो ब्रिटनचे नागरिकत्व मिळविण्यासाछी अर्ज केला आहे. त्याची पत्नी ब्रिटनची असल्याने त्याने हा अर्ज केला असल्याची माहिती होती मात्र, आता आयपीएल खेळता यावी म्हणून त्याने हा अर्ज केल्याची चर्चा केली जात आहे. 

आयपीएल ही जगातील सर्वांत मोठी ट्वेंटी20 स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो. मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंना मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएल खेळण्यास बंदी घातली आहे.

.. तर आयपीएलसाठी आमीर होईल पात्र

आमीरला जर ब्रिटिश नागरिकत्व मिळाले तर त्याला पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळता येणार नाही. 
यापूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूद ब्रिटिश नागरिकत्व मिळवत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यामुळे आमीरला जर ब्रिटिश नागरिकत्व मिळाले तर तो भारतात आयपीएल खेळू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad amir wants to play IPL and might leave country for it