सर्वोत्तम क्रिकेटपटू ते दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं; कैफने काढली इम्रान खानची लायकी

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे. 

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे. 

INDvsSA : रोहितसोबतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लपाछपी एकदाची संपली : पुजारा

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भाषण करताना दहशतवादाशी धर्माचा संबंध नसतो असे विधान केले. तसेच सध्याचे भारतीय सरकार हे संघाच्या अधिपत्याखाली असून द्वेष आणि एकाधिकारशाहीवर स्थापित आहे असेही ते म्हणाले. 

त्यांच्या याच भाषणावर कैफने आणि त्याचसह वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग यांनीही टीका केली आहे. कैफ म्हणाला, "नक्कीच. दहशतवादाचा धर्माशी काहीही संबंध नसतो मात्र, पाकिस्तानचा दहशतवादाशी नक्कीच खूप संबंध आहे. पाकिस्तानाच दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. तुम्ही संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत दिलेले भाषण अत्यंत दुर्देवी होते. सर्वोत्तम क्रिकेटपटू ते पाकिस्तानचे सैन्य दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं असा तुमचा प्रवास झाला आहे.''

महाराष्ट्रापेक्षा जास्त राजकारण होतं मुंबई क्रिकेटमध्ये!

कैफशिवाय वीरेंदेर सेहवागनेही ''हा माणूस स्वत:ला बदनाम करण्यासाठी दरवेळी नवेनवे मार्ग शोधून काढतो,'' अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Kaif Slams Imran Khan calls him Puppet Of Pakistan Army And Terrorists