Mohammed Shami Match Fixing : शमीवरील मॅच फिक्सिंग आरोपांबाबत टीम इंडियातील सहकाऱ्याचा मोठा खुलासा

Mohammed Shami Match Fixing
Mohammed Shami Match Fixingesakal

Mohammed Shami Match Fixing : भारतीय संघातील सर्वात गुणवान वेगवान गोलंदाज म्हणून कोणाचे नाव घेतले जात असले तर तो आहे मोहम्मद शमी! त्याची चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता, सीमवर असलेला कमालीचे नियंत्रण आणि मोक्याच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो भारताचा स्टार वेगवान गोलंदाज बनला.

Mohammed Shami Match Fixing
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! दिग्गज खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर

मात्र मोहम्मद शमीचा प्रवास सोपा नव्हता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळाचे सावट त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीवर देखील पडले. शमीचे त्याच्या पत्नीसोबचे नाते आणि त्यातील ताणतणाव हा जगजाहीर झाला आहे. हसीन जहाँने मोहम्मद शमीवर अनेक आरोप केले होते. यात मॅच फिक्सिंग सारखा मोठा आरोप देखील होती. यामुळे मोहम्मद शमीची चौकशी देखील झाली होती.

बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटने मॅच फिक्सिंग प्रकरणी मोहम्मद शमीची चौकशी केली होती. याबाबत नुकतेच क्रीकबझच्या 'राईज ऑफ न्यू इंडिया' या कार्यक्रमात भारताचा माजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शमीवर झालेल्या मॅच फिक्सिंग आरोपांबाबत काही खुलासे केले.

Mohammed Shami Match Fixing
Jemima Rodrigues : पाकविरुद्धच्या विजयासाठी कोहलीकडून प्रेरणा

इशांत शर्मा म्हणाला की, 'मी त्याच्यासोबत चर्चा केली होती. शमी माझ्यासोबत अनेक विषयांवर बोलत असायचा. अँटी करप्शन युनिटबाबत जे काही झालं ते आमच्यापर्यंत देखील आलं. त्यांनी आम्हाला विचालं की शमी मॅच फिक्सिंग करू शकतो की नाही.'

शर्मा म्हणाला की, 'पोलीस अधिकारी जसा तक्रार दाखल करताना चौकशी करतो. तसंच मला सर्व विचारण्यात आले. मी जे काही बोललो ते लिहून देखील घेण्यात आले. मी त्यांना सांगितलं की मला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही माहिती नाही. मात्र मला 200 टक्के खात्री आहे की तो असं करू शकत नाही कराण मी त्याला चांगला ओळखतो.'

मोहम्मद शमीला वैयक्तिक आयुष्टात खूप खडतर काळातून जावे लागले होते. या गोष्टींचा त्याच्या व्यावसायिक क्रिकेटमधील कारकिर्दीवर देखील परिणाम होऊ शकला असता. मात्र त्याने यातून सावरत आपली कारकीर्द घडवली. तो कष्टाच्या जोरावर पुन्हा एकदा भारताचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज झालाय. बीसीसीआयने देखील त्याला चौकशीनंतर क्लीन चीट दिली होती.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com