IND vs NZ: या भारतीय संघावर शंका..., पत्रकारांना मोहम्मद शमीचे सडेतोड उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mohammed shami

IND vs NZ: या भारतीय संघावर शंका..., पत्रकारांना मोहम्मद शमीचे सडेतोड उत्तर

Mohammed Shami : रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला आणि 3 वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताच्या विजयाचे नायक मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज होते.

मोहम्मद शमीने 6 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले तर सिराजने 6 षटकात 10 धावा देत 1 बळी घेतला. या दोन्ही गोलंदाजाच्या तडाख्यामुळे न्यूझीलंडचा निम्मा संघ 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर परत येणे कठीण झाले. पाहुण्या संघाचा डाव 34.3 षटकांत 108 धावांत गुंडाळला गेला. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20.1 षटकात 2 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.

हेही वाचा: Steve Smith : 9 षटकार 5 चौकार, स्मिथने पुन्हा ठोकले झंझावाती शतक

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमीच्या चमत्कारी कामगिरीनंतर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. पत्रकार परिषदेदरम्यान मोहम्मद शमीला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या तयारीबाबत विचारण्यात आले.

हेही वाचा: Sania Mirza : सानियाची महिला दुहेरी कारकीर्द पराभवाने संपली...

यावर मोहम्मद शमीने सडेतोड उत्तर देताना सांगितले की, गेल्या 4-6 वर्षातील निकाल पाहता या टीम इंडियावर शंका घेतली जाऊ शकत नाही. विश्वचषकाला अजून बराच अवधी आहे. याआधी संघ बरेच सामने खेळणार आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर मोहम्मद शमीची टिप्पणी आली आहे. 2019 च्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून 2-3 असा पराभव झाल्यानंतर संघाने एकही मालिका गमावलेली नाही.

हेही वाचा: IND vs NZ: न्युझीलंडला नाव ठेवले, फॅन्सनं इरफानच्या घशात दात घातले

एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, मोहम्मद शमी पुढे वर्कलोड मॅनेजमेंट बाबत बोलताना म्हणाला की, मी नेहमी सरावापेक्षा सामने खेळण्यास प्राधान्य देतो. मोठ्या स्पर्धेच्या तयारीसाठी जास्तीत जास्त सामने खेळणे केव्हाही चांगले. भारनियमन केले जात असून त्याचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे. मला आशा आहे की विश्वचषकापूर्वी प्रमुख खेळाडू चांगल्या स्थितीत असतील.”