IND vs PAK : 36 धावा 8 विकेट्स! बाबर - रिझवाननं टेन्शन वाढवलं होतं मात्र सिराज, बुमराहसह कुलदीपनं चित्रच पालटलं

IND vs PAK
IND vs PAK esakal

IND vs PAK : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमधील दुबईत झालेल्या सामन्याच्या आठवणी ताज्या केल्या होत्या. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची दमदार भागीदारी रचत पाकिस्तानला 155 धावांपर्यंत पोहचवले.

मात्र मोहम्मद सिराजने ही जोडी फोडली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडून काढत पाकिस्तानचा डाव 191 धावात संपुष्टात आणला. बुमराह आणि सिराजला कुलदीप यादव, रविंद्र जडेजाने आणि हार्दिक पांड्याने देखील उत्तम साथ दिली. या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

IND vs PAK
IND vs PAK CWC 2023 LIVE : पाकिस्तानचा 191 धावात खुर्दा; भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी

रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या काही षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला लय सापडली नाही. त्यामुळे पाकिस्तानी सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिक यांना जम बसवण्याची संधी मिळाली. अखेर 41 धावांची सलामी दिल्यानंतर सिराजनेच शफिकचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला पहिला धक्का दिला होता.

यानंतर इमाम आणि बाबर आझमने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न हार्दिक पांड्याने 36 धावा करणाऱ्या इमामला सेंड ऑफ देत हाणून पाडला. मात्र या दोन विकेट्सचा आनंद फार काळ टिकला नाही.

पाकिस्तानची अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचली. बाबर आझमने 57 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. तर रिझवान अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता.

IND vs PAK
Virat Kohli : आवरा आता... विराट कोहलीनं लाखभर प्रेक्षकांसमोर रिझवानला केलं ट्रोल

या जोडीने दुबईत झालेल्या 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमधील 152 धावांच्या नाबाद सलामीच्या कटू आठवणी ताज्या केल्या. मात्र लय सापडलेला मोहम्मद सिराज संघासाठी धावून आला. त्याने बाबर आझमला त्रिफळा उडवत पाकिस्तानला 155 धावांवर तिसरा धक्का दिला.

यानंतर कुलदीप यादवने एकाच षटकात सौद शकिल आणि इफ्तिकार अहमदला बाद करत पाकिस्तानची अवस्था 5 बाद 166 अशी केली.

डाव सावरण्याची सर्व जबाबदारी आता रिझवानवर आली होती. मात्र जसप्रीत बुमराहने त्याचा 49 धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानला मोठा धक्का दिला. यानंतर पाकिस्तानचा डाव सावरला नाही. हसन अलीच्या 12 धावा सोडल्या तर इतर फलंदाजांना फार काही करता आलं नाही. पाकिस्तानचा संघ 191 धावात गारद झाला. अवघ्या 36 धावात पाकिस्तानच्या 8 विकेट्स गेल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com