esakal | WTC INDvsNZ : फायनलसाठी टीम ठरली! सिराज बाकावरच!
sakal

बोलून बातमी शोधा

India playing XI WTC final

WTC INDvsNZ : फायनलसाठी टीम ठरली! सिराज बाकावरच!

sakal_logo
By
सुशांत जाधव

World Test Championship Final : न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट फायनलच्या लढतीसाठी टीम इंडियाने एक दिवस अगोदरच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीये. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात मोहम्मद सिराजला संधी मिळेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र ही चर्चा फोल ठरली असून त्याला बाकावरच बसावे लागणार आहे. सराव सामन्यात दमदार खेळी करुन दाखवणाऱ्या अनुभवी ईशांत शर्मावरच टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवलाय. फलंदाजीमध्ये रोहित शर्मासोबत शुभमन गिल डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. (Mohammed Siraj Out Ishant In BCCI bcci announce Virat Kohli Lead India playing XI For WTC Final)

मध्यफळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे तर विकेट मागे पंतचाच जलवा दिसेल. या सर्वांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार हे जवळपास निश्चितच होते. अष्टपैलूच्या रुपात टीम इंडियात रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाला फिक्स करणअयात आले आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांच्या अनुभवाचा मारा होताना पाहायला मिळेल.

भारतीय प्लेइंग इलेव्हन

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

loading image