Ind vs Eng : मोहम्मद सिराजचा अचानक टीम इंडियातून पत्ता कट, BCCI ने सांगितले कारण

Mohammed Siraj Released From India Squad News : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
India vs England 2nd Test Mohammed Siraj marathi news
India vs England 2nd Test Mohammed Siraj marathi news

India vs England 2nd Test Mohammed Siraj : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करावे लागले.

केएल राहुलच्या जागी रजत पाटीदारला तर रवींद्र जडेजाच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी मुकेश कुमारचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयनेही सिराजबाबत अपडेट दिले आहे.

India vs England 2nd Test Mohammed Siraj marathi news
Rajat Patidar Debut Ind vs Eng Test : ...अखेर प्रतीक्षा संपली; पाटीदार झाला टीम इंडियाचा भागीदार! टीम इंडियात 3 मोठे बदल

मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करून दिली. बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मोहम्मद सिराजला विशाखापट्टणम मधील दुसऱ्या कसोटीसाठी संघातून बाहेर करण्यात आले आहे. मोहम्मद सिराज सातत्याने क्रिकेट खेळत असून मालिकेचा दीर्घ कालावधी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल. आवेश खान पुन्हा दुसऱ्या कसोटीसाठी संघात सामील झाला आहे.

विशाखापट्टणम कसोटीनंतर दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये सुरू होणार आहे. दुसरी आणि तिसरी टेस्टमध्ये 10 दिवसांचे अंतर आहे. याच कारणामुळे बीसीसीआयने सिराजला सोडले. त्यानंतर 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान चौथा कसोटी सामना होणार आहे. मालिकेतील शेवटची कसोटी चौथ्या कसोटीनंतर 10 दिवसांनी म्हणजेच 7 मार्चपासून सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com