BCCI ची मोठी घोषणा! मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; बुमराहची जागा घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI ची मोठी घोषणा! मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; बुमराहची जागा घेणार

BCCI ची मोठी घोषणा! मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; बुमराहची जागा घेणार

दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या जसप्रित बुमराहच्या जागी आता भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा BCCI ने केली आहे. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून सिराजचा संघात समावेश केल्याची माहिती दिली.

मोहम्मद सिराजने टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून तो चमकला आहे. सिराजने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. सिराजने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यादरम्यान त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. यात त्याने 10 सामन्यात 13 विकेट्स पटकावल्या होत्या.