पैगंबर मोहम्मद प्रकरणी मोईन अलीने भारताला दिली धमकी?

पैगंबर मोहम्मद प्रकरण आता क्रिकेट जगतापर्यंत पोहचले.
Moeen Ali
Moeen Alisakal

सध्या सर्वत्र पैगंबरांचा विषय बराच गाजतोय. भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा विषय आणखी चिघळला. दरम्यान आता हे प्रकरण क्रिकेट जगतात गेलं आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अलीच्या नावाने एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंग्लंडच्या खेळाडूने भारताला धमकी दिली असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.

@Moeen_Ali18 या हँडलवरुन एक ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये, 'जर भारताने आपल्या निंदनीय वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही, तर मी पुन्हा भारतात सामने खेळण्यासाठी कधीही जाणार नाही, मी आयपीएलवरही बहिष्कार टाकेन. आणि मी माझ्या मुस्लिम बांधवांनाही असेच आवाहन करेन. मला मुहम्मद P.B.U.H. वर प्रेम आहे.' असे म्हटले आहे.

हे ट्विट सध्या चांगलच व्हायरल होत आहे.

फॅक्ट चेक

व्हायरल होणारे हे ट्विट बनावट आहे. @MoeenaliAli हे इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर मोईन अलीचे अधिकृत ट्विटर हँडल पाहाल तर तुम्हाला असा कोणताही मेसेज पाहायला मिळणार नाही. त्याने असे कोणतेही ट्विट केलेलं नाही.

हे फेक अकाऊंट असून त्यामुळे भारताविरोधात अपप्रचार केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद आता जगभरात उमटतायत. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं असलं तरी हा वाद आता पेटला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com