Virat Kohli : अखेर 1021 दिवसांची प्रतिक्षा संपली! 71 वे 'विराट' शतक साकारले

Virat Kohli 71 Century
Virat Kohli 71 Centuryesakal

Virat Kohli 71th Century : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाची प्रतिक्षा अखेर संपली. विराट कोहलीने आशिया कपमधील अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात आपले पहिले वहिले टी 20 आंतरराष्ट्रीय शतक (122 धावा) ठोकत आपली 70 शतकांवर अडकलेली गाडी 71 वर नेली. याचबरोबर त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शकतांच्या यादीत रिकी पाँटिंगशी बरोबरी केली. आता शतकांच्या यादीत विराट कोहलीपुढे फक्त शतकांचे शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर उरला आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या. ही त्याची टी 20 मधील सर्वोत्तम खेळी ठरली.

Virat Kohli 71 Century
Asia Cup IND vs AFG Live : विराट कोहलीचे 71 वे शतक; भारत 200 पार

गेल्या काही वर्षापासून बॅडपॅचमधून जाणाऱ्या विराट कोहलीने एक महिन्याचा ब्रेक घेतला. ब्रेकनंतर तो आशिया कपमध्ये भारतीय संघात परतला. त्याने आशिया कपची दमदार सुरूवात करत सलग दोन अर्धशतके ठोकली. इथेच विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे संकेत मिळाले. आता आशिया कपच्या शेवटच्या सामन्यात विराटने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी करत शतकाचा दुष्काळ देखील संपवला. त्याने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 6 षटकार मारले.

रोहित शर्माच्या अनुपस्थिती सलामीला उतरलेल्या केएल राहुल आणि विराट कोहलीने 119 धावांची शतकी सलामी दिली. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या फरीद अमहम मलिकने ही जोडी फोडली. त्याने 62 धावांवर केएल राहुलला बाद केले. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. मात्र पुढच्याच चेंडूवर फरीदने सूर्याचा त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला.

Virat Kohli 71 Century
Viral Video : सारा अली खान, शुभमन गीलच्या व्हिडिओवर ‘बहुत सारा प्यार’च्या शुभेच्छा

यानंतर मात्र विराट कोहलीने आपला गिअर बदलला. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपले बहुप्रतिक्षित 71 वे शतक ठोकले. विशेष म्हणजे विराट कोहलीचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले विहिले शतक आहे. ही शतकी खेळी करण्यासाठी विराट कोहलीला टी 20 सामन्यांचे शतक पार करावे लागले. त्याच्या नाबाद 122 धावांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरूद्ध 20 षटकात 2 बाद 212 धावा ठोकल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com