CSK ला आठवला धोनीसोबतचा प्रवास; कारण माहितीये?

Indian Premier League CSK And MS Dhoni
Indian Premier League CSK And MS DhoniSakal

Indian Premier League CSK And MS Dhoni : आयपीएलच्या मेगा लिलावात मजबूत संघ बांधणी करुन मुंबई इंडियन्सची बरोबरी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings))संघाचा मैदानात उतरेल. याआधी सध्या सोशल मीडियावर धोनी आणि CSK जोरदार चर्चा सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्जनं धोनीसोबतच्या आठवणीला उजाळा देणारा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओला जोरदार पसंती मिळत असून अनेक लोक प्रतिक्रियाही देत आहेत.

20 फेब्रुवारी हा दिवस आयपीएल चाहते आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जसाठी खास असाच आहे. 2008 मध्ये याच दिवशी आयपीएलचा पहिला लिलाव पार पडला होता. चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी धोनीला संघात घेण्याच्या इराद्याने या लिलावात उतरली होती. अनेक संघ मालक धोनीसाठी कितीही रुपये मोजण्यासाठी तयार होते. पण बाजी मारली ती चेन्नई सुपर किंग्जनं. एकदा धोनी चेन्नईत आला आणि तो त्यांचा झाला तो झालाच.

Indian Premier League CSK And MS Dhoni
IPL मधील बोलीपैकी किती रक्कम खेळाडूला मिळते?
Indian Premier League CSK And MS Dhoni
IPL 2022 : शिखर धवन होणार प्रितीच्या संघाचा 'किंग'

आयपीएलच्या लिलावात सर्वात विक्रमी बोली ही धोनीवरच लागली होती. चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 9.5 कोटी रुपये मोजले होते. सुरुवातीपासून धोनी एकाच संघाकडून खेळताना दिसते. 2016 आणि 2017 ही दोन वर्ष चेन्नई सुपर किंग्जसाठी निराशजनक होती. दोन वर्षे संघावर बंदीची कारवाई झाली. त्यामुळे संघ आयपीएलच्या मैदानात दिसला नव्हता. या काळात धोनी रायझिंग पुणे सुपर जाएंट्सकडून खेळला. 2018 मध्ये त्याने पुन्हा CSK एन्ट्री केली. एवढेच नाही यावर्षी चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदही मिळवले. धोनीने चेन्नईसोबत 14 वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भात खास पोस्ट केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com