कॅप्टन कूल धोनीचे पत्नी साक्षीसोबत इंग्लंडमध्ये BIRTH DAY सेलिब्रेशन; पाहा व्हिडिओ

41वा वाढदिवस माहीने इंग्लंडमध्येही खास पद्धतीने साजरा केला.
mahendra singh dhoni birthday celebrates with wife sakshi friends england party
mahendra singh dhoni birthday celebrates with wife sakshi friends england partySAKAL

MS Dhoni Birthday: भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी आज 41 वर्षांचा झाला. 41वा वाढदिवस माहीने इंग्लंडमध्येही खास पद्धतीने साजरा केला आहे. धोनी आणि साक्षीचा लग्नाचा वाढदिवस 4 जुलैला होता. दोघांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहे. अशा परिस्थितीत हे दोघे सुट्ट्यांमध्ये इंग्लंडला गेले आहे. इथे दोघांनी लग्नाचा वाढदिवसही साजरा केला आणि आता धोनीचा वाढदिवसही साजरा केला.(mahendra singh dhoni birthday celebrates with wife sakshi friends england party)

mahendra singh dhoni birthday celebrates with wife sakshi friends england party
MS Dhoni 41th Birthday: 'माही'चे ही पाच रेकॉर्ड मोडणे खूप कठीण

धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तुम्ही टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतला हे पाहू शकता. पंत सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे एक कसोटी सामना खेळायचा होता. आता तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनीने एकदा झकास दिसत आहे. धोनी आधी मेणबत्ती विझवतो आणि त्यानंतर दोन्ही हातांनी चाकू धरून केक कापताना दिसत आहे. यादरम्यान व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये इंग्रजी गाणं वाजत आहे.

mahendra singh dhoni birthday celebrates with wife sakshi friends england party
Dhoni 41th Birthday: धोनीने खेळाडूंना सांगितलं, 'आता देव सुद्धा तुम्हाला...' अन् घडला इतिहास

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2019 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. माही आयपीएलमध्ये खेळत आहे. तो सध्या चेन्नई संघाचा कर्णधारही आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली देशासाठी तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली प्रथम 2007 टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com