धोनीची वादग्रस्त निवड; BCCI सचिव जय शाह यांचा षटकार

धोनीची मेंटॉर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मध्य प्रदेश क्रिकेट मंडळाचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी धोनीची निवड अयोग्य असल्याचे सांगत तक्रार दाखल केली होती.
Jay Shah and MS Dhoni
Jay Shah and MS Dhoni Sakal

युएईच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी महेंद्र सिंह धोनीला संघासोबत ठेवण्याचा मोठा निर्णय बीसीसीआयने घेतला. धोनीची मेंटॉर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मध्य प्रदेश क्रिकेट मंडळाचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी धोनीची निवड अयोग्य असल्याचे सांगत तक्रार दाखल केली होती. यावर बीसीसीआय काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अपेक्षेप्रमाणे बीसीसीआयकडून याचे उत्तर मिळाले आहे.

Jay Shah and MS Dhoni
T20 World Cup: "रोहित, विराट, धोनी अन् शास्त्री गुरूजी..."

महेंद्र सिंह धोनी वर्ल्ड कपवेळी भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहे. याबदल्यात तो कोणतेही मानधन घेणार नाही, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. जर धोनी मानधनच घेणार नसेल तर हिससंबंधाच्या नियमाचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे धोनीची मार्गदर्शक म्हणून निवड झाल्यानंतर निर्माण झालेला वादावर पडदा पडणार असल्याचे चित्र दिसते. धोनीच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्यांच्या विरुद्ध बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी षटकारच खेचला आहे.

धोनीची भारतीय संघाच्या मार्गदर्शकपदी (Mentor) केलेली निवड अवैध असल्याचे बोलले जात होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसतो. नियमावलीनुसार, एक व्यक्ती एकाच वेळी दोन्ही पदावर कार्यरत राहू शकत नाही. यातून दुहेरी हितसंबंधांच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. अशी तक्रार धोनीच्या निवडीनंतर झाली. पण आता धोनी मानधनच घेणार नसल्यामुळे या तक्रारीत काहीच अर्थ उरत नाही.

Jay Shah and MS Dhoni
सारा तेंडुलकरच्या फोटोवर बॉलिवूडचा चॉकलेट बॉय झाला फिदा

रवी शास्त्री संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्याचवेळी धोनी भारतीय संघाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे. विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टी-20 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व सोडणार आहे. त्यामुळे धोनीसोबत असल्याचा त्याला कितपत फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com