MS Dhoni Kapil Dev Playing Golf Video Gone Viral
MS Dhoni Kapil Dev Playing Golf Video Gone Viral esakal

MS Dhoni Playing Golf : दोन वर्ल्डकप विजेते कर्णधार गोल्फच्या मैदानावर आले एकत्र

MS Dhoni Kapil Dev Playing Golf : भारताचे दोन वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी एकत्र गोल्फ खेळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव हे गुरूग्राम येथील गोल्फ क्लबमध्ये एकत्र गोल्फ खेळत होते. महेंद्रसिंह धोनी हा कपिल देव यांच्या ग्रँड थ्रोनटन इनव्हिटेशन इव्हेंट 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने गोल्फ स्टिकवर देखील आपला हात आजमवाला. त्याने कपिल देव यांच्याबरोबर देखील गोल्फ खेळण्याचा आनंद लुटला. या दोन वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांचे गोल्फ खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाले.

MS Dhoni Kapil Dev Playing Golf Video Gone Viral
IND vs SA 2nd T20 : गुवाहाटीत होणाऱ्या दुसऱ्या टी 20 सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी

कपिल देव आणि महेंद्रसिंह धोनी गोल्फ खेळाताना पाहून क्रिकेट चाहते देखील सुखावले. महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव हे क्रिकेट इतिहासातील दोन सुवर्ण पानं आहेत. कपिल देव यांनी 1983 ला पहिल्यांदा भारताला वर्ल्डकप जिंकून दिला होता. तर महेंद्रसिंह धोनीने याची पुनरावृत्ती तब्ब्ल 28 वर्षांनी 2011 ला केली होती.

गुरूग्राम येथील ही स्पर्धा कपिल देव यांनी भरवली आहे. या स्पर्धेला कपिल देव ग्रँड थ्रोनटन इनव्हिटेशन 2022 असे नाव दिले आहे. या स्पर्धेशी आता धोनी देखील जोडला गेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com