Video : धोनी दिसला पुढाऱ्याच्या वेशात; करणार राजकारणात प्रवेश?

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लष्कराचे प्रशिक्षण परतल्यावर पुढाऱ्याच्या पोशाखात दिसला आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लष्कराचे प्रशिक्षण परतल्यावर पुढाऱ्याच्या पोशाखात दिसला आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. 

धोनीने राजकीय भूमिका साकारत केलेल्या एका जाहीरातीमुळे या चर्चांना उधाण आले आहे. धोनीला या अगोदर अशा पोशाखात कुणी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे तो राजकारणात नवी इनिंग सुरु करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. 

विश्वकरंडकातून टीम इंडिया बाहेर पडल्यावर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा होती मात्र, त्याने दोन महिन्यांसाठी क्रिकेटमधून ब्रेक घेत लष्करामध्ये प्रशिक्षण घेतले. यापूर्वीही धोनी केंद्रीय गृहमंत्री  अमित शहांचीही भेट घेतली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni might enter politics