esakal | एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे, धोनीच्या निर्णयावर चाहते फिदा
sakal

बोलून बातमी शोधा

महेंद्रसिंग धोनी

एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे, धोनीच्या निर्णयावर चाहते फिदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

T20 World Cup 2021 : पुढील आठवड्यापासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. २४ ऑक्टोबर रोजी पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानशी लढणार आहे. यंदा भारतीय संघासोबत धोनीही असणार आहे. संपूर्ण विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात मेंटॉर म्हणून धोनीची नियुक्ती करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी या सेवेसाठी कोणतेही मानधन घेणार नाही, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंगळवारी जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही धोनीच्या या निर्णयाचे कौतुक केलं आहे. धोनीने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

भारताला दोन विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या धोनीचा अनुभव येत्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी फायदेशीर ठरेल, यासाठी त्याची प्रेरक म्हणून निवड करण्यात आली. आयपीएल खेळत असलेल्या धोनीचा चेन्नई संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. धोनीशी चर्चा करूनच त्याच्यावर प्रेरक ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी धोनीने आपण कोणतेही मानधन घेणार नसल्याचे बीसीसीआयला त्याच वेळी सांगितले होते.

टी-20 विश्वचषकातील भारताचे सामने

24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान

31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड

3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान

5 नोव्हेंबर: भारत विरुद्ध B1

8 नोव्हेंबर: भारत विरुद्ध A2

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर

loading image
go to top