MS Dhoni And Donald Trump : ट्रम्प तात्याही निघाले 'थाला'चे चाहते! धोनीसोबत खेळले गोल्फ; व्हिडिओ व्हायरल

MS Dhoni and Donald Trump video
MS Dhoni and Donald Trump video

MS Dhoni and Donald Trump Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा एक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतात. धोनीने क्रिकेट विश्वात अनेक यश संपादन केले आहे. पण, या खेळाव्यतिरिक्त त्याला इतर अनेक खेळांमध्येही रस आहे. धोनीला फुटबॉलसोबतच टेनिस आणि गोल्फचीही आवड आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी काल कार्लोस अल्काराजचा यूएस ओपन सामना पाहण्यासाठी होता. आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

MS Dhoni and Donald Trump video
US Open 2023: रोहन बोपण्णाचा विश्वविक्रम, वयाच्या 43 वर्षी रचला इतिहास... US Open जिंकण्यापासून एक पाऊल दूर

एमएस धोनी आणि डोनाल्ड ट्रम्प गोल्फ कोर्सवर दिसत आहेत. धोनीने हातात गोल्फ स्टिक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांनी धोनीसाठी एक मॅच आयोजित केली होती. तर एका व्हिडिओमध्ये धोनी आणि ट्रम्प एकत्र खेळताना दिसत आहेत.

42 वर्षीय धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे आयपीएल 2023 नंतर टी-20 लीगमधून निवृत्ती घेतली जाईल अशी अटकळ होती. अशा परिस्थितीत त्यांच्या वयाची चर्चा सुरू झाली. धोनीच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. धोनीचा हा आयपीएलमधील शेवटचा सीझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. पण आयपीएल 2023 संपल्यामुळे त्याने पुढच्या हंगामातही खेळण्याचे संकेत दिले.

MS Dhoni and Donald Trump video
US Open 2023 : अल्काराझ-मेदवेदेवमध्ये उपांत्य झुंज; झ्वेरेव, रुबलेवचे आव्हान संपुष्टात

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. धोनी हा क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली आपल्या संघासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 2007 टी-20 विश्वचषक, 2011 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना दिसत आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com