MS Dhoni Playing Tennis : क्रिकेटचं मैदान सोडून धोनी उतरला टेनिस कोर्टात! व्हिडीओ होतोय व्हायरल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर देखील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चर्चेत असतो
MS Dhoni Plays Tennis
MS Dhoni Plays TennisEsakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर देखील क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चर्चेत असतो. आता भारताचा माजी कर्णधार धोनी टेनिस कोर्टवर पाहायला मिळाला. आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान माही टेनिस कोर्टवर आपल्या कूल साइलमध्ये पाहायला मिळाला.

धोनीचा टेनिस खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये धोनी हाफ टी-शर्टमध्ये टेनिस खेळताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये चौकार षटकार लगावणारा धोनी टेनिसच्या कोर्टवर देखील आरामत टेनिस खेळताना व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

MS Dhoni Plays Tennis
Rohit Sharma : गांगुली, धोनीसारख्या दिग्गज कर्णधारांना जमलं नाही ते रोहितने करून दाखवलं; पाहा Video

अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये धोनीने आयपीएलचा पुढचा सीझन खेळण्याबाबत मोठी हिंट दिली होती. धोनीबाबत असे म्हटले जात होते की, त्याने केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आयपीएलमधून नाही. यावरून माही आयपीएल खेळणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. याशिवाय माहीने त्याच्या गुडघ्याबाबत अपडेटही दिली होती.

MS Dhoni Plays Tennis
Rohit Sharma : नेदरलँड्सविरुद्ध 9 खेळाडूंनी का केली गोलंदाजी? कर्णधार रोहित म्हणाला, 'गरज नसताना आमचे...'

आयपीएल 2023 मध्ये धोनीकडून जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. खालच्या क्रमाने फलंदाजी करताना त्याने संघासाठी शॉर्ट फिनिशिंग खेळी खेळली. चेन्नईच्या कर्णधार राहिलेल्या धोनीनी 16 सामन्यांमधील 11 डावात फलंदाजी करताना 34.67 च्या सरासरीने आणि 185.71 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या. या काळात त्याने 10 षटकार आणि 3 चौकार मारले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com