MS Dhoni : धोनीची 'ती' पत्रकार परिषद होतीय ट्रोल, खोटा गंभीरसुद्धा घेतोय मज्जा

धोनीच्या घोषणेनंतर खोटा गंभीरची पोस्ट व्हायरल
MS Dhoni press conference Troll
MS Dhoni press conference Trollsakal

MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी तो जेव्हा एखादी घोषणा करतो तेव्हा करोडो चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. असेच काहीसे 24 सप्टेंबरला देखील दिसले जेव्हा माहीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले. 25 सप्टेंबरला हे माहीच्या घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

MS Dhoni press conference Troll
Virat Kohli : सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच! 'द वॉल' राहुल द्रविडला टाकले मागे

धोनी नेमकी काय घोषणा करणार, कोणती महत्वाची आणि मोठी माहिती देणार, याविषयी चर्चा होऊ लागली. चाहत्यांनी असा अंदाज लावला की कदाचित माही CSK चे कर्णधारपद सोडणार आहे. आगामी IPL 2023 खेळणार नाही. पण 25 सप्टेंबरला धोनी लाइव्ह आल्यावर या सर्व अफवा खोट्या ठरल्या. हे सिद्ध झाले कारण धोनीने हे लाइव्ह केवळ ओरियो बिस्किट कंपनीच्या मोहिमेसाठी आला होता. पण, घोषणेनंतर धोनी अचानक ट्रोल झाला. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तर खोटा गंभीर म्हटलंय की, 1983 मध्ये भारतात #Oreo नव्हता तरीही भारताने कप जिंकला होता.

MS Dhoni press conference Troll
IND vs AUS : दिनेश कार्तिकच्या हातात ट्रॉफी; ऋषभ पंत एका कोपऱ्यात

धोनीनं निवृत्तीसंदर्भात बातमी नव्हे तर एका बिस्किटच्या लाँचची होती. त्यानं 2011च्या विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयाशी जोडून बिस्किट लाँच केलं. धोनीनं देशात पुन्हा हे बिस्किट लाँच केलं आहे. धोनीनं याचा संबंध 2011 विश्वचषकाशी जोडला आहे. धोनी म्हणाला की, 2011 मध्ये भारतानं विश्वचषक जिंकला होता त्यावेळी हे बिस्किट भारतात लाँच करण्यात आलं. आता पुन्हा एकदा हे बिस्किट देशात लाँच होत आहे यावर्षी आणखी एक कप जिंकणार आहे. धोनीच्या घोषणेनंतर खोटा गंभीरची पोस्ट व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com