पाकिस्तान्यांनो सावध राहा; आमचा कॅप्टन काश्मीर खोऱ्यात गस्त घालतोय!

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

- धोनी काश्मीर खौऱ्यात घालणार गस्त
- विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेत दोन महिने निम लष्करी दलासोबत घेणार प्रशिक्षण
- तो काश्मीर खोऱ्यात गस्त घालणार असून त्याच्या बटालियनसोबतच राहणार आहे​

श्रीनगर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विंडीज दौऱ्यातून रजा घेत निम लष्करी दलात दोन महिने प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याने त्याची नियुक्ती काश्मीरच्या खोऱ्यात केली असून तो तेथे गस्त घालणार आहे. 

''लेफ्टनंट कर्नल एमएस धोनी हा निम लष्करी दलाच्या 106 TA बटालियनसोबत जम्मू काश्मिरमध्ये गस्त घालणार आहे. तो 31 जुलै ते 15 ऑगस्ट या काळात काश्मीर खोऱ्यात सेवा करेल,'' असे भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले आहे. 

तसेच त्या निवदेनात, धोनीने इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे आणि मुख्यालयाने परवानगी दिल्यानुसार तो काश्मीर खोऱ्यात गस्त घालणार असून त्याच्या बटालियनसोबतच राहणार आहे. 

लष्कराने धोनीला 2011मध्ये निम लष्करादलात लेफ्टनंट कर्नलपद दिले आहे. त्याच्यासह अभिनव बिंद्रा आणि दिपक राव यांनाही हा सन्मान देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni will serve in Kashmir to perform patrolling and guard duty