आकाशचा हट्ट! अंबानी मँचेस्टर, लिव्हरपूल नाही तर 'हा' क्लब घेणार विकत? | Mukesh Ambani Purchasing Football Club Arsenal

Mukesh Ambani Purchasing Arsenal Football Club
Mukesh Ambani Purchasing Arsenal Football Clubesakal

Mukesh Ambani Purchasing Arsenal Football Club : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले उद्योपती मुकेश अंबानी आता युरोपातील फुटबॉल क्लब विकत घेणार असल्याचे वृत्त आले आहे. मात्र अंबानी हे मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपूल की अर्सेनाल क्लब विकत घेणार याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मुकेश अंबानी यांनी 2008 मध्ये आयपीएलचा मुंबई संघ विकत घेतला होता. त्यानंतर त्यांनी इंडियन फुटबॉल सुपर लीग सुरू केली. आता ते युरोपातील फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक करत क्रीडा क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Mukesh Ambani Purchasing Arsenal Football Club
BAN vs IND 1st Test Day 3 Live : शुभमन गिलने ठोकले अर्धशतक, वाढवली भारताची आघाडी

नुकतेच लिव्हरपूलची मालकी असलेल्या फेनवे स्पोर्ट्स ग्रुपने तसेच मँचेस्टर युनायडेटचे मालक ग्लेझेर कुटुंबाने क्लबमध्ये बाहेरची गुंतवणूक वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. या क्लबमध्ये मुकेश अंबानी आपली गुंतवणूक करण्याच उत्सुक असल्याचे वृत्त आले आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज हे वृत्त खोडून काढत अंबानी या दोन क्लबमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी उत्तर लंडनमधील क्लबमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील असे सांगण्यात आल्याचे वृत्त एबीपी न्यूज चॅनलने दिले आहे.

Mukesh Ambani Purchasing Arsenal Football Club
FIFA WC22 Golden Boot : मेस्सी - एम्बाप्पेला नाही तर तिसऱ्यालाच मिळू शकतो गोल्डन बूट

अर्सेनालमध्येच गुंतवणूक करण्यामागचे कारण हे मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी असल्याचे सांगण्यात येत आहे. कराण आकाश हा अर्सेनालचा सपोर्टर आहे. मिळालेल्या वृत्तानुसार 'अंबानींचा 31 वर्षाचा मुलगा आकाश हा अर्सेनालचा मोठा फॅन आहे. त्यामुळे जर अंबानी कुटुंबीय जर युरोपातील फुटबॉल विश्वात आपली एन्ट्री करणार असतील तर ते अर्सेनालची निवड करण्याची शक्यता आहे.'

अर्सेनालची मालकी सध्या क्राँके स्पोर्ट्स आणि एन्टरटेंनमेंट कंपनीकडे आहे. स्टॅन क्राँके या कंपनीचे मालक आहेत. सध्या त्यांचा मुलगा जॉश क्राँके दैनंदिन कामकाज पाहत आहे.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com