
पुणे : महाराष्ट्राच्या मुक्तानंद पेंडसेने यु इन स्पोर्ट्स आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत (१७०० गुणांखालील) साडेआठ गुणांसह विजेतेपद पटकावले.आळंदी येथील एमआयटी अकादमी ऑफ इंजिनिअरिंग येथे संपलेल्या या स्पर्धेत मुक्तानंद पेंडसेने नऊ फेऱ्यांअखेर ८.५ गुण मिळवले. अखेरच्या फेरीतील आराना गुप्तासोबतची बरोबरीही त्याला जेतेपदासाठी पुरेशी ठरली. त्याला ७० हजार रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात आले.