Mumbai T20 League: मुंबई टी-२० लीगसाठी आज लिलाव; पुरुष अन् महिला विभागात २,४११ खेळाडूंचा समावेश
Mumbai T20 League Auction: मुंबई टी-२० लीगच्या लिलावात पुरुष व महिला संघांसाठी २,४११ खेळाडूंचा समावेश; आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्टार खेळाडूंसह अर्जुन तेंडुलकरही बिडिंगसाठी पात्र. महिलांसाठी प्रथमच होणारी ही टी-२० लीग उत्सुकतेस पात्र ठरेल.
मुंबई :आयपीएलनंतर काही दिवसांत सुरू होणाऱ्या पुरुष आणि महिला मुंबई टी-२० लीगचे पडघम वाजले आहे. उद्या या दोन्ही लीगसाठी खेळाडूंचा महत्त्वपूर्ण लिलाव होणार आहे. पुरुष आणि महिला मिळून २,४११ खेळाडू लिलावात असणार आहेत.