Ranji Trophy : विदर्भचा लढा कौतुकास्पद मुंबईच्या तुषार देशपांडेचे मत

आव्हान भले मोठे असले तरी विदर्भने दिलेला लढा आणि केलेला प्रतिकार कौतुकास्पद होता, असे मत मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने व्यक्त केले.
Mumbai Tushar Deshpande views Vidarbha fight as commendable ranji trophy
Mumbai Tushar Deshpande views Vidarbha fight as commendable ranji trophySakal

मुंबई : आव्हान भले मोठे असले तरी विदर्भने दिलेला लढा आणि केलेला प्रतिकार कौतुकास्पद होता, असे मत मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने व्यक्त केले. विजयासाठी अजूनही त्यांना २९० धावांची गरज असली तरी आम्हाला पाच विकेट मिळवायच्या आहेत, असेही तो चौथ्या दिवसाच्या खेळानंतर म्हणाला.

वानखेडेची ही खेळपट्टी उत्तरोत्तर संथ होत गेली आहे, त्यामुळे सुरुवातीला मिळवलेले वर्चस्व आम्हाला आज चौथ्या दिवशी कायम राखला आले नाही. आम्हाला संघर्ष करावा लागणार, याची कल्पना होती. त्यादृष्टीने आम्ही तयारही होतो, असे देशपांडे म्हणाला.

खेळ संपता संपता मी आखूड टप्प्याचा मारा केला. नवा चेंडू उपलब्ध झाल्यानंतर माझ्याकडे असलेल्या अतिरिक्त वेगामुळे कर्णधार अजिंक्य रहाणे याने मला तशा सूचना केल्या होत्या, असे देशपांडेने सांगितले.

विजयासाठी प्रयत्न करणार : नायर

आव्हान भलेमोठे असले तरी त्याचा विचार करायचा नाही. प्रत्येक सत्राचा विचार करून खेळ करायचा, असे आम्ही ठरवले आणि त्यानुसार चौथ्या दिवशी खेळ केला आता ९० षटकांत २९० धावा करणे सोपे नसले तरी आम्ही आजही असाच खेळ करणार असल्याचे विदर्भचा फलंदाज करुण नायरने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com