Mushtaq Ali Trophy 2023 : आरारारा खतरनाक! अर्जुन तेंडुलकरने 4 चेंडूत 3 विकेट्स घेत फिरवला सामना अन्...

Arjun Tendulkar Mushtaq Ali Trophy 2023
Arjun Tendulkar Mushtaq Ali Trophy 2023

Arjun Tendulkar Mushtaq Ali Trophy 2023 : एकीकडे वर्ल्ड कप 2023 चा थरार भारतात रंगला आहे, तर दुसरीकडे भारतात देशांतर्गत क्रिकेटही सुरू झाली आहे. भारतात खेळल्या जाणार्‍या देशांतर्गत टी-20 टूर्नामेंट सय्यद मुश्ताक ट्रॉफीला कालपासून सुरुवात झाली आहे.

सोमवारी स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि अनेक सामने खेळल्या गेले. यामध्ये आंध्र आणि गोवा यांच्यात रांचीमध्ये सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना गोव्याने 20 षटकांत 6 विकेट गमावून 232 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरात आंध्रनेही चांगली सुरुवात केली, परंतु अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात आपल्या घातक गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आणि गोव्याला पहिला विजय मिळवून दिला.

Arjun Tendulkar Mushtaq Ali Trophy 2023
World Cup South Africa vs Netherlands : दक्षिण आफ्रिका विजयाच्या हॅट्‌ट्रिकसाठी सज्ज! नेदरलँड संघाकडून धक्कातंत्राची आशा

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याने 17व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिकी भुईला आऊट केले. या विकेटनंतर सामना पूर्णपणे गोव्याच्या हातात आला. आणि 19व्या षटकात अर्जुनने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. म्हणजे अर्जुनने शेवटच्या 4 चेंडूत तीन विकेट घेतल्या.

Arjun Tendulkar Mushtaq Ali Trophy 2023
World Cup : भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान किक्रेट मध्ये भूकंप, माजी दिग्गज खेळाडूने केला धक्कादायक खुलासा

अर्जुन तेंडुलकरने आपल्या देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात मुंबईतून केली होती, पण त्याला मुंबई संघाकडून संधी मिळत नव्हत्या, त्यामुळे त्याने 2022-23 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामापूर्वी संघ बदलला आणि गोव्याच्या संघात सामील झाला. गेल्या वर्षीही अर्जुनने गोव्यासाठी काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

अर्जुन तेंडुलकरला 2021 च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्या संघासह 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत समाविष्ट केले होते. 2023 च्या आयपीएल लिलावापूर्वी मुंबईने अर्जुन तेंडुलकरला सोडले होते, लिलावात 30 लाख रुपये देऊन त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते. अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 4 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने फलंदाजीत केवळ 13 धावा केल्या आहेत तर गोलंदाजीत 3 विकेट्स घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com