esakal | नांदेडच्या 'संजीवनी'ची काठमांडूतील बाँक्सिंग स्पर्धेसाठी निवड
sakal

बोलून बातमी शोधा

नायगाव (जि.नांदेड) : जनता कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी संजीवनी इबीतवार  हिने देशपातळीवरील १६ वर्ष वयोगटातील बाँक्सिंग स्पर्धेत सिल्वर पदक मिळवल्याने नेपाळ येथील काठमांडू येथे होणाऱ्या हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदरच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करुन तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

नांदेडच्या 'संजीवनी'ची काठमांडूतील बाँक्सिंग स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नायगाव (जि.नांदेड) : येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी संजीवनी शंकर इबीतवार (Boxing Player Sanjeevani Ibitawar) हिने देशपातळीवरील १६ वर्ष वयोगटातील बाँक्सिंग स्पर्धेत सिल्वर पदक मिळवल्याने नेपाळ येथील काठमांडू (Kathmandu) येथे होणाऱ्या हाफकिडो बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदरच्या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गोवा येथे देशपातळीवर १६ वर्ष वयोगटातील (Nanded) बाँक्सिंग स्पर्धा नुकतीच झाली. यात तिने सिल्वर मेडल मिळवले. ऑल इंडिया हाफकिडो बॉक्सिंग (All India Hapkido Boxing Competition) स्पर्धेचे अध्यक्ष यु. नटराजन यांच्या स्वाक्षरीने तिला प्रमाणपत्र व रजत पदक देऊन गौरव केला. संजीवनी (Naigaon) ही बिलोली तालुक्यातील बडूर येथील असून तिला वडील नाहीत. मात्र तिने अथक परिश्रम करुन हे यश संपादन केले आहे. ती सध्या नायगाव येथील जनता हायस्कूलमध्ये ११ वी विज्ञान शाखेत शिकत आहे.

हेही वाचा: खऱ्या आयुष्यातील किर्तनकार शिवलीला, पाहा न पाहिलेले PHOTO

गोवा येथील देशपातळीवरील स्पर्धेत यश मिळाल्यानंतर तिची नेपाळ येथील काठमांडू येथे होणाऱ्या बाँक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल एज्युकेशन सोसायटी नायगावचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी सदरील विद्यार्थिनीचे अभिनंदन करून रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन काठमांडू येथे होणाऱ्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एज्युकेशन सोसायटी नायगावचे सचिव प्रा. रवींद्र चव्हाण आणि जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के. जी. सूर्यवंशी, बालाजी बेटमोगरेकर, मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण, प्राचार्य श्रीधर बेटमोगरेकर, पर्यवेक्षक सरगुले, क्रीडा शिक्षक यशवंतराव चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर बैस, प्रा. संगमेश्वर शिंदे, प्रा. उत्तम पाटील, प्रा. गजानन शिंपाळे, प्रसिद्धीप्रमुख प्रा. पी. डी. जाधव बारुळकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top