PSL Naseem Shah : नसीम शाहनेच पाकिस्तान प्रीमियर लीगचा दरिद्रीपणा आणला समोर; Photo व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PSL Naseem Shah Helmet Row

PSL Naseem Shah : नसीम शाहनेच पाकिस्तान प्रीमियर लीगचा दरिद्रीपणा आणला समोर; Photo व्हायरल

PSL Naseem Shah Helmet Row : पाकिस्तानमध्ये सध्या पाकिस्तान प्रीमियर लीग (PSL) चे सामने सुरू आहेत. नुकताच मुकल्तान सुल्तान आणि क्वेट्टा ग्लॅडिएटर यांच्यात सामना झाला. मात्र हा सामना क्वेट्टा ग्लॅडिएटरचा वेगवान गोलंदाज नसीम शाहमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला. या प्रकरणी नसीम शाहला दंडही ठोठावण्यात आला आहे.

क्वेट्टा ग्लॅडिएटर आणि सुल्तान मुल्तान यांच्यातील सामन्यात ग्लँडिएटरकडून खेळणाऱ्या नसीम शाहने एका मोठी चूक केली. त्याने क्वेट्टा ग्लॅडिएटरचे हेलमेट न घालता बांगलादेश प्रीमियर लीगमधील कॉमिला व्हिक्टोरियन संघाचे हेलमेट घातले. ही बांगलादेश प्रीमियर लीगमधील फ्रेंचायजी आहे. याबाबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे नसीम शाहला ट्रोल देखील करण्यात आले.

पाकिस्तान प्रीमियर लीगची PCB चे अधिकारी आणि माजी खेळाडू कायम आयपीएलशी तुलना करत असतात. मात्र पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूकडे देखील त्याच्या फ्रेंचायजीचे हेलमेट नसावे किंवा त्याच्याकडे ज्या फ्रेंचायजीचा सामना खेळतोय त्या फ्रेंचायजीचे हेलमेट घालावे इतकीही व्यावसायिकता नसावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सामन्याबाबत बोलायचे झाले तर क्वेट्टा ग्लॅडिएटरने मुल्तान सुल्तानसमोर 110 धावांचे आव्हान ठेवले होते. सुल्तानने हे आव्हान 13.3 षटकात पार केले. 20 वर्षाच्या इशानुल्लाने 4 षटकात 12 धावा देत 5 बळी टिपले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच