Ashes 2019 : फलंदाजांचा कर्दनकाळ नॅथन लायनने टाकले डेनिस लिलीला मागे 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

लीड्‌स - ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिन गोलंदाज नॅथन लायन याने ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला बाद करून कारकिर्दीमधील 356वा बळी मिळविला.

या कामगिरीने त्याला ऑस्ट्रेलियाच्याच डेनिस लिली यांना मागे टाकले असून, आता तो सर्वाधिक गडी बाद करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. लायनने ही कामगिरी 89व्या कसोटी सामन्यात केली. त्याच्यापुढे ग्लेन मॅग्रा (563) आणि शेन वॉर्न (708) यांचा क्रमांक आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nathan Lyon breaks the record of Denis Lily in ahes 2019