
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश उपांत्य फेरीत
पिंपरी : हॉकी पंजाब, हॉकी उत्तर प्रदेश आणि हॉकी कर्नाटक यांनी संयमी खेळाचे प्रदर्शन करताना सफाईदार वियृजय मिळवून ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या (National Hockey Championship) उपांत्य फेरीत प्रवेश केला. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील नेहरुनगर परिसरातील मेजर ध्यानचंद मैदानावर आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पंजाबने आपला शेजारी चंडिगडचा प्रतिकार २-१ असा मोडून काढला. दुसऱ्या सामन्यात कर्नाटकाने बंगालवर ३-२ असा पराभव केला.
दोन वेळच्या विजेत्या पंजाबला आज चंडिगडचा बचाव भेदण्यासाठी झगडावे लागले. पंजाबनेही बचावावर भर देत चंडिगडच्या आक्रमकांची कोंडी केली. एकमेकांची ताकद ओळखून खेळण्याच्या प्रयत्नात मध्यंतराला गोलफलक गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरारार्धात ऑलिंपियन ब्रॉंझपदक विजेत्या रुपिंदरचा अनुभव आणि खेळ निर्णायक ठरला. त्यानेच दोन गोल नोंदवत पंजाबची उपांत्य फेरी निश्चित केली. चंडिगडचा एकमात्र गोल अर्षदीपने ५०व्या मिनिटाला नोदंवला.
हेही वाचा: सोलापूर-मिरज एक्सप्रेस सुरु करण्यास मिळेना मुहूर्त
मध्यंतराच्या बरोबरीनंतर उत्तरार्धात सामन्याच्या ४९व्या मिनिटाला रुपिंदरपालने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चारच मिनिटांनी अर्षदीपने गोल करताना चंडिगडला बरोबरी साधून दिली. पण, त्यानंतर पंजबाच्या रुपिंदरच्या मैदानालगत आलेल्या वेगवान ड्रॅग फ्लिकला रोखताना चंडिगडच्या जशनदीप सिंग याचे प्रयत्न अपुरे पडले आणि हाच गोल निर्णायक ठरला.
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात कर्नाटकाने कमालीच्या चुरशीने झालेल्या सामन्यात बंगालचे आव्हान परतवून लावले. सामना संपताना ५८व्या मिनिटाला अलि अन्सर याने कॉर्नवर नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. त्यापूर्वी सामन्याच्या ९व्या मिनिटाला अस्लम लाक्रा याने गोल करून बंगाला सनसनाटी आघाडी मिळवून दिली होती. गोल सपाटा लावणाऱ्या कर्नाटकाने बरोबरी साधण्यासाठी २१व्या मिनिटाची वाट बघावी लागली. तेव्हा मंहमद राहिलने गोल नोंदवला. त्यानंतर ३०व्या मिनिटाला हरिष मुटगर याने कॉर्नरवर गोल साधून कर्नाटकाला आघाडी मिळवून दिली. कर्नाटकाने पूर्ण स्पर्धेत प्रथमच पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. जिद्दीने खेळणाऱ्या बंगालने ४०व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली होती.
तिसऱ्या लढतीत उत्तर प्रदेशाने हॉकी हरयानाचे आव्हान २-१ असे परतवून लावले. पाठोपाठ झालेल्या गोलने बरोबरीत आलेल्या सामन्यात पूर्वार्धातच नोंदवलेला गोल निर्णायक ठरला. सामन्याच्या १२व्या मिनिटाला महंमद अमिर खानने गोल केल्यावर पुढच्याच मिनिटाला मनदीपने हरियानाला बरोबरी राखून दिली. सामन्याच्या २५व्या मिनिटाला महंमद सादिकने नोंदवलेल्या गोलने उत्तर प्रदेशाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आल्याने पूर्वार्धातील गोलच निर्णायक ठरला.
हेही वाचा: पिंपरी : विवाहितेची तेरा वर्षांच्या मुलीसह आत्महत्या
निकाल -
हॉकी पंजाब २ (रुपिंदर पाल सिंग ४६, ५३वे मिनिट) वि.वि. हॉकी चंडिगड १ (अर्षदीप सिंग ५०वे मिनिट)
हॉकी कर्नाटक ३ (मोहंमद राहिल २१वे, हरिष मुटगर ३०वे,अली अन्सर ५८वे मिनिट) वि.वि. हॉकी बंगाल २ (अस्लम लाक्रा ९वे, अभिषेक प्रताप सिंग ४०वे मिनिट)
हॉकी उत्तर प्रदेश २ (महंमद अमिर खान १२वे, महंमद सादिक २५वे मिनिट) वि.वि. हॉकी हरियाना (मनदीप १३वे मिनिट)
Web Title: National Hockey Championship Maharashtra Punjab Uttarpradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..