राष्ट्रीय क्रीडा दिवस : क्रीडा मंत्र्यांनी वाहिली मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली

सुशांत जाधव
Saturday, 29 August 2020

देशातील दिग्गज खेळाडू  ध्यानचंद यांचा जन्मदिवस  राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

नवी दिल्ली: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. देशातील दिग्गज खेळाडू  ध्यानचंद यांचा जन्मदिवस  राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली. 29 ऑगस्ट या राष्ट्रीय खेळ दिनी क्रीडा जगतात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान देखील करण्यात येतो. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचा सन्मान हा राष्ट्रपती भवनामध्ये न करता ऑनलाइनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  

क्रीडा जगतातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय क्रीडा दिनी किरेन रिजिजू म्हणाले की, खेळ जगतात उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणाऱ्या पुरस्कार राशीत वाढ करण्यात आली आहे. खेळ क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना 25 लाख तर  अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 15 लाख रुपये दिले जातील, अशी माहिती देखील रिजिजू यांनी दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NationalSportsDay Union Sports Minister Kiren Rijiju pay floral tribute to Major Dhyan Chand on his birth anniversary