Navdeep Saini : भारताला आणखी एक धक्का, मोहम्मद शमीनंतर नवदीप सैनीही बाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navdeep Saini Ruled Out India A vs New Zealand A ODI Series

Navdeep Saini : भारताला आणखी एक धक्का, मोहम्मद शमीनंतर नवदीप सैनीही बाहेर

Navdeep Saini Ruled Out India A vs New Zealand A ODI Series : भारतीय खेळाडू नवदीप सैनी दुखापतीमुळे भारत अ संघातून बाहेर पडला आहे. सैनी न्यूझीलंड अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार होता. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नवदीपला दुखापत झाली आहे. त्या स्पर्धेत तो उत्तर विभाग संघाचा एक भाग आहे. नवदीपच्या जागी ऋषी धवनचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: IND vs AUS : तब्बल 43 महिन्यांनंतर टीम इंडियात उमेश यादवची एन्ट्री

बीसीसीआयने ट्विटद्वारे सैनीच्या दुखापतीची माहिती दिली. बोर्डाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले की, नवदीप सैनी उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान जखमी झाला. तो सध्याच्या स्पर्धेतून तसेच भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडत आहे. निवड समितीने नवदीपऐवजी ऋषी धवनचा संघात समावेश केला आहे.

नवदीप सैनीने टीम इंडियासाठी दोन कसोटी, 8 एकदिवसीय आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान नवदीपने वनडेमध्ये 6, कसोटीत 4 आणि टी-20 फॉरमॅटमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल मध्येही तो 30 सामने खेळला आहे. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा: IND vs SA : पहिल्या T20 सामन्यावर संकट, स्टेडियममध्ये नाही ​​लाईट; सामना कसा होणार

न्यूझीलंड अ विरूद्ध होणारी ही वनडे मालिका सप्टेंबर 22 पासून सुरू होणार आहे. ही मालिका चेन्नईमध्ये होणार असून या मालिकेतील पुढील दोन सामने हे 25 आणि 27 सप्टेंबरला होणार आहेत.

भारतीय अ संघ :

पृथ्वी शॉ, अभिमन्यू इश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (विकेट किपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सने, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, ऋषी धवन, राज अंगद बवा

Web Title: Navdeep Saini Ruled Out Of India A Series Against New Zealand A Odi Series Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..