IND vs PAK T20 Playing 11 : टीम इंडियामध्ये शमी खेळण्याबाबत शंका, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी

IND vs PAK T20 Playing 11 : टीम इंडियामध्ये शमी खेळण्याबाबत शंका, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आज एकमेंकाशी भिडणार आहेत. दोन्ही संघाचा टी20 विश्वचषक स्पर्धेतील हा पहिलाच सामना असणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे. दरम्यान, क्रिकेट जगतात मोहम्मद शमीच्या खेळण्यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. (ND Vs PAK T20 World Cup Dream11 Playing XI mohammed shami )

भारताचा फलंदाजीचा क्रम आधीच ठरलेला आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे समजते. हार्दिक पांड्या विराटसोबत तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव मधल्या फळीत फलंदाजी करेल. सामना संपवण्याची जबाबदारी दिनेश कार्तिकवर असेल. कार्तिकच्या जागी पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भारताच्या फलंदाजीत डावखुरा फलंदाज नसला तरी तो बदल होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान शमीच्या गोलंदाजीवर शंक उपस्थित करण्यात आली आहे. अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग खेळणे जवळपास निश्चित आहे, मात्र अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते.

भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपली गोलंदाजी ठरवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग खेळणे जवळपास निश्चित आहे, मात्र अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराहच्या जागी टी-२० विश्वचषकात मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र, जसप्रीत बुमराहच्या जागी टी-२० विश्वचषकात मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला आहे. शमीच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'हर्षल पटेल हा विश्वचषक स्पर्धेपर्यंतच्या गोलंदाजीचा एक भाग आहे, तो मधल्या षटकांपासून अखेरपर्यंत गोलंदाजी करतो, त्यामुळे मला वाटते. त्याची जागा संघात असेल.

अशी असेल भारताची टीम

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन/युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह

सामन्यापूर्वीच पाकिस्तानचा संघ जवळपास निश्चित झाला आहे. शान मसूद दुखापतीतून सावरला असून तो खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचवेळी फखर जमान अजूनही गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नसल्याने या सामन्यापूर्वी त्याला तंदुरुस्त होणे कठीण आहे. बाबर आणि रिझवान जोडी डावाची सुरुवात करेल. शान मसूद, शादाब खान आणि मोहम्मद नवाज मधल्या फळीत कमाल करतील. सामना संपवण्याची जबाबदारी हैदर अली आणि आसिफ अली यांच्यावर असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com