हार्दिक पंड्याच्या आगमनानंतर फक्त कसोटी क्रिकेटपुरताच मर्यादित राहिलेल्या रवींद्र जडेजाला तो एकदिवस क्रिकेट खेळू शकतो हे स्वत:लाच सिद्ध करायचे होते असे त्याने सामन्यानंतर बोलून दाखवले.
INDvsWI : स्वत:लाच सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी वनडे खेळू शकतो
भुवनेश्वर : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विराटसोबत एका बाजूने टिच्चून फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिलेला फलंदाज म्हणजे रवींद्र जडेजा.
हार्दिक पंड्याच्या आगमनानंतर फक्त कसोटी क्रिकेटपुरताच मर्यादित राहिलेल्या रवींद्र जडेजाला तो एकदिवस क्रिकेट खेळू शकतो हे स्वत:लाच सिद्ध करायचे होते असे त्याने सामन्यानंतर बोलून दाखवले.
तो म्हणाला, ''मला दुसऱ्या कोणाला नाही पण स्वत:ला सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी अजूनही मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळू शकतो. मला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो.''