
बंगळूर : नीरज चोप्राच्या कामगिरीने भारतीय ॲथलेटिक्सचे नाव गेल्या नऊ वर्षांपासून जागतिक पातळीवर प्रामुख्याने झळकू लागले आहे. आता नीरजच्या पुढाकाराने उद्या शनिवारी (ता. ५) होत असलेल्या नीरज चोप्रा क्लासिक (एनसीसी) भालाफेक स्पर्धेच्या निमित्ताने आयोजनाच्या दृष्टीनेही भारताचे नाव आदराने घेतले जाईल, अशी अपेक्षा आहे.