Neeraj Chopra : नीरज चोप्रा विजेतेपद वाचवण्यासाठी लावणार जोर, कधी अन् कोठे पाहायचा मोफत सामना?

Neeraj Chopra
Neeraj Chopraesakal

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. याचबरोबर त्याने डायमंड लीग फायनल्सचे देखील विजेतेपद पटकावल होते. आता हेच विजेतेपद अबाधित राखण्यासाठी तो मैदानावर उतरणार आहे. (Dimond League Final)

गेल्या वर्षी नीरज चोप्राने ज्युरिक डायमंड लीग स्पर्धेतचे विजेतेपद पटकावले होते. या हंगामात त्याने सध्या तरी स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. हा फॉर्म कायम ठेवण्याचा तो या डामंड लीग फायनल्समध्ये देखील प्रयत्न करेल. जर नीरज चोप्रा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला तर तो 30 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळवणार आहे.

Neeraj Chopra
The Rock In WWE : तब्बल 4 वर्षानंतर द रॉक WWE मध्ये परतला! जॉन सेनाने पाहताक्षणीच...

तसेच डायमंड ली ट्रॉफीचे विजेतेपद अबाधित राखणारा तो तिसरा खेळाडू होईल. यापूर्वी चेक रिपब्लिकच्या विटेजस्लाव वेस्लीने 2012 आणि 2013 मध्ये डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले होते. तर जॅकब वाडलेज्चने 2016 आणि 2017 मध्ये डायमंड लीग जिंकली होती. नीरज चोप्राचे 89.94 मीटर भालाफेक ही सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. त्याला अजून 90 मीटरचा मार्क पार करता आलेला नाही. या डामयंड लीगमध्ये तो यासाठी देखील प्रयत्नशील असेल.

Neeraj Chopra
Sourav Ganguly: क्रिकट सोडून 'या' क्षेत्रात सौरव गांगुली करणार बॅटिंग, केली मोठी घोषणा

डायमंड लीगची फायनल कधी सुरू होणार?

नीरज चोप्राची डायमंड लीग फायनल ही 17 सप्टेंबरला रात्री 12 वाजून 50 मिनिटांनी सुरू होणार आहे.

डायमंड लीगची फायनल टीव्हीवर कोणत्या चॅनलवर पाहायची?

डायमंड लीगची फायनल व्हायकॉम 18 टीव्ही चॅनलवर पाहू शकता.

डायमंड लीगचे फायनलचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे का?

डायमंड लीगचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे जियो सिनेमावर मोफत होणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com